शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सहमती पत्र, ‘आधार’नंतरच निराधारांना अनुदान!

By admin | Updated: January 20, 2017 02:17 IST

वाशिम जिल्ह्यातील सर्वच बँकांना निर्देश; अग्रणी बँकेला जिल्हाधिका-यांचे पत्र.

वाशिम, दि. १९- शासनाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी आधार क्रमांक आवश्यक केल्यानंतर लाभार्थींना अनुदानाचे वितरण करताना बँकांकडे लाभार्थीच्या आधारकार्डची प्रत व सहमती पत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकार्‍यांकडून लीड बँकेच्या शाखाधिकार्‍यांना पत्र पाठवून आधार कार्डची सत्यप्रत आणि सहमती पत्र सादर केल्याशिवाय लाभार्थींना अनुदान वितरीत न करण्याचे निर्देश देण्याची सूचना १७ जानेवारी रोजी दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. शासनाने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजनेच्या लाभाथीर्ंसाठी आधार क्रमांक आवश्यक केले. त्यानंतर जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्यावतीने डिसेंबर २0१६ मध्ये विशेष मोहीम राबवून विविध योजनांतून अनुदान घेणार्‍या लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यातील ९४ हजार लाभार्थींपैकी ७0 हजारांच्यावर लाभार्थींनी आपले आधार क्रमांक सादर केलेले होते, तर विशेष मोहिमेंतर्गत त्यात आणखी १६ हजार लाभार्थींच्या आधार क्रमांकाची भर पडली होती. ही मोहीम ३१ डिसेंबर २0१६ पयर्ंत राबविताना लाभार्थींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे अनुदान स्थगित ठेवण्यात आले होते. मोहीम राबविल्यानंतर आधार क्रमांकांची पडताळणी करण्यात आली आणि पात्र लाभार्थींचे अनुदान बँकांकडे पाठविण्यात आले. या अनुदानाचे वितरण लाभार्थींना करताना त्यांच्याकडून आधार कार्डची सत्यप्रत, तसेच, मोबाइल क्रमांक नमूद असलेले आणि स्वत:ची ओळख पटविणारे सहमती पत्र बँकांना घ्यावे लागणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी लीड बँक वाशिमच्या शाखाधिकार्‍यांना पत्र पाठविले असून, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींकडून त्यांचे सहमती पत्र आणि आधार कार्डची सत्यप्रत घेण्याच्या सूचना सर्वच संबंधित बँकांना देण्याचे निर्देश त्या पत्रातून दिले आहेत. सहमती पत्र आणि आधार कार्डची सत्यप्रत सादर केल्याशिवाय अनुदान वितरीत करू नये, असे निर्देश देण्याची सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.