शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

सनगाव-शेंदुरजना आढाव रस्त्याची अवस्था दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:37 IST

मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा-शेंदुरजना आढाव या ११ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामधील सनगाव ते शेंदुरजना या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे ...

मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा-शेंदुरजना आढाव या ११ किलोमीटर अंतराच्या रस्त्यामधील सनगाव ते शेंदुरजना या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन ठिकठिकाणी खडी उघडी पडली, तर मोठमोठे खड्डेही तयार झाले. या रस्त्याने बंजारा बांधवांची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, अकोला येथील शेकडो भाविक विविध वाहनाने प्रवास करतात. शिवाय शेंदुरजना ही मोठी बाजारपेठ असून, येथे मोठे महाविद्यालय व शाळाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह व्यावसायिक आणि इतर लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रवास या रस्त्याने होत असतो. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था वाईट असतानाही दुरुस्ती करण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी शेंदुरजना आढावनजीक काही अंतरातील रस्त्याचे खडीकरण करण्यात आले; परंतु डांबरीकरण झालेले नसून, या ठिकाणी डांबरीकरण करण्यासह संपूर्ण रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी विष्णू आढाव, पंजाब आडे, गणेश जाधव, प्रमोद आडे, किशोर पवार, राम राठोड, किशोर पोफळे आदींनी केली आहे.