धनज बु।। ते मेहा हा रस्ता धनज आणि मेहा येथील ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा आहे. पुढे हा रस्ता धोत्रा देशमुख या गावाला जोडतो. त्यामुळे या रस्त्याने वाहनांची नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. अगदी रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर वाहने धावत असतात. रात्रीच्या वेळी आजारी व्यक्तीला रुग्णालयात न्यावयाचे म्हटले तर या रस्त्याने वाहन खूप जपून चालवावे लागते वाहनाचा वेग वाढविला, तर अपघाताची भीती आणि वाहन हळू चालविले, तर आजारी व्यक्तीच्या जीवाची भीती, अशा दुहेरी समस्येचा सामना या रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या चालकांना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून केली जात आहे.
----------------
दहा वर्षांपासून डागडुजीच नाही
हा ते धनज बु।। ये रस्त्याचे काम जवळपास दहा वर्षांपूर्वी झाले होते. त्यामुळे दोन्ही गावातील लोकांना चांगला आधार झाला. वाहतूक सुरळीत होऊ लागली, परंतु गेल्या दहावर्षांत आजवर एकदाही या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. त्यामुळे हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्डामय झाला असून, या रस्त्यावरील खड्डे बुजवून हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करावा अशी मागणी मेहा व धनज बु. येथील ग्रामस्थ करीत आहेत.