शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ४६ शाळांना स्वखर्चातून मोफत  पुरविले संगणक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:24 IST

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना  हायटेक करण्यासाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांना  संगणकीय ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून येथील  बेटर टुमारो फाउंडेशनने ४६ शाळांना संगणक  संचासह शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत दिले आहे. या पुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प बेटर टुमारो  फाउंडेशनचे सर्वेसर्वा वामनराव सानप यांनी सोडला  आहे.

ठळक मुद्देबेटर टुमारो फाउंडेशनचा उपक्रम शाळा होताहेत हायटेक 

विवेकानंद ठाकरे । लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना  हायटेक करण्यासाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांना  संगणकीय ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून येथील  बेटर टुमारो फाउंडेशनने ४६ शाळांना संगणक  संचासह शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत दिले आहे. या पुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प बेटर टुमारो  फाउंडेशनचे सर्वेसर्वा वामनराव सानप यांनी सोडला  आहे. खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस् थेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा फारसा उच्च नसतो.  तसेच भौतिक सुविधा फारशा उपलब्ध नसतात,  अशी ओरड नेहमीच होत आली आहे. शासनाच्या  विविध योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत  आता भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.  यासोबतच रिसोड येथील बेटर टुमारो फाउंडेशनने स् थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना मोफत संगणक  संच व अन्य साहित्य पुरविण्याचा अनोखा उपक्रम  सुरू केला आहे. या कामी वामनराव सानप यांनी  विशेष पुढाकार घेतला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानासोबत  डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने एक नव्हे, तर  तब्बल ४६ जिल्हा परिषद शाळांना संगणक संचासह  शैक्षणिक साफ्टवेअर मोफत दिले आहे.वामनराव सानप हे पुणो येथे अभियंता आहेत. ग्रामीण  भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने  चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने  त्यांनी सदर उपक्रम हाती घेतला आहे. एका वर्षात  ४६ शाळांना संगणक संच व साफ्टेवअर भेट दिले. यामध्ये रिसोड तालुक्यातील आगरवाडी, बोरखेडी,  लोणी बु., चाकोली, मोहजा इंगोले, मांडवा, धोडप  बोडखे, नावली, वाडी रायताळ, जवळा, किनखेडा,  सवड, गोभणी, गोवर्धन, महागाव, खडकी सदार,  किनखेडा, देगाव, मोप, भापूर, तर मालेगाव तालुक्या तील एरंडा, गिव्हा, धारपिंप्री, काळाकामठा, मेडशी  वसारी, दुधाळा, केळी, कोळगाव, उमरावाडी,  ब्राह्मणवाडा, भेरा, मैराळडोह यासह अन्य शाळांचा  समावेश आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना  डिजिटलची जोड देण्यासाठी व विद्यार्थ्यांना संगणक  साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून बेटर टुमारो  फाउंडेशनच्यावतीने शाळांना संगणक संच व  शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत देण्याचा उपक्रम सुरू  केला आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळत  असल्याचा आनंद आहे. यापुढेही स्थानिक स्वराज्य  संस्थेच्या शाळांना मोफत संगणक संच पुरविण्याचा  मानस आहे.- वामनराव सानपअध्यक्ष, बेटर टुमारो फाउंडेशन, रिसोड.