शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याच्या सूचना

By admin | Updated: May 14, 2017 13:43 IST

शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी दिल्या.

वाशिम : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळांमध्ये करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी दिल्या.संबंधित शाळेत शिक्षण घेत असताना, विद्यार्थी व विद्यार्थिनींना व्यवस्थापन किंवा अन्य घटकांबाबत काही तक्रारी असू शकतात. या तक्रारींचे आॅन दी स्पॉट निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटया बसविण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसविली नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनात आली. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागाने एक पत्रक जारी करून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार वाशिम जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. तक्रारपेटी बसविण्याची कार्यवाही शाळा व्यवस्थापन व शाळा प्रशासनाला करावी लागणार आहे. संबंधित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशव्दाराच्या नजीक, संबंधितांच्या नजरेस येईल अशा रितीने लावण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. प्रत्येक आठवडयात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ही तक्रारपेटी उघडण्यात येणार आहे. तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेवून तक्रार निवारण करण्याबाबत तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून शाळेत तक्रारपेटी न बसविणाऱ्या शाळांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे, असेही तुरणकर यांनी सांगितले.