शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणतज्ञांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 20:21 IST

मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.

ठळक मुद्देग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली.शिक्षणाशिवाय गरीबी दूर होणार नाही म्हणून पालक, शिक्षकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे, शाळेची उपस्थिती वाढवुन शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच शासनाच्या विविध योजना आदिवासी, अनुसुचीत जाती च्या लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजे,त्यासाठी प्रशासनातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी तत्पर असावे, अनेक गावात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक आठ ते पंधरा दिवस येत नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितल्यावरुन त्यांनी चिंता व्यक्त केली. येथील जिल्हा परिषदच्या शाळांनाही त्यांनी भेट देवुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.चवथ्या वर्गातील मुलांना जोडाक्षरे, बेरीज, वजाबाकी आली पाहिजे असे त्यांनी शिक्षकांना सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे, घरकुल, शौचालये आदि कामाच्या दर्जा व सुधारणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त करुन प्रशासनाबाबत चिड व्यक्त केली. महाराष्ट्र बदलतो आहे असे म्हटल्या जाते, मात्र ग्रामीण महाराष्ट्रातील गाव,तांड्यावर विकासाच्या बाबतीत बºयाच सुधारणा होणे बाकी आहे. बंजारा समाजातील बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि मागासलेपणा त्यांच्या गरीबीस कारणीभूत आहे. उसतोड कामगारांचा प्रश्न असो वा शेतात राबवणाºया मजूरांच्या मजुरीचा प्रश्न कायम आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी काही प्रकल्प राबविले पाहिजे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही असावे असेही त्यांनी म्हटले. राज्यातील १०० गावांना भेटी देवुन गरीबी बाबत आपण अहवाल लिहून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार असेही त्यांनी सांगितले. त्यांचे सोबत वाशिम येथील विठ्ठल जोशी, सत्यजीत कांबळे, कोल्हे व मानोरा येथील माणिक डेरे, संजय अलदर होते. माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या निवासस्थानी वाईगौळ येथे जावुन त्यांनी त्यांचेसोबत चर्चा केली.