शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

येऊ दे आपत्ती,आम्ही आहोत सज्ज

By admin | Updated: July 13, 2014 22:32 IST

अग्निशमन विभागात नव्याने दाखल झाले अत्याधुनिक साहित्य

वाशिम: आपतकालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असेल तर कुठल्याही नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्तीचा तितक्याच सहजतेने मुकाबला करता येऊ शकते. स्थानिक नगर पालिकेने ही यंत्रणा उभी केली आहे. पालिकेच्या आपतकालीन यंत्रणेत अत्याधुनिक अग्निशमन बंब, फ्लोट पंप, वुडन कटर सारख्या आयुधांची भर पडली आहे. त्यामुळे आता शहरवासीयांनाच नव्हे तर जिल्हावासीयांनाही आपत्तीशी लढण्याचे बळ प्राप्त झाले आहे.पालिकेची आपतकालीन व्यवस्था दिवसागणिक कात टाकतेयं. सन २0१३ मध्ये मिळालेल्या १३ लाख रूपयातून पालिकेने आपल्या आपतकालीन ताफ्यात अत्याधुनिक बंबासह काही नविन आयुधे समाविष्ट केली आहेत. यामध्ये पैट्रोल इंजिनवर चालणारे वूडन कटर, फ्लोट पंप, स्टील ओपणर आदींचा समोवश आहे. पूर्वी पालिकेकडे आग विझविणासाठी केवळ दोनच बंब होते. सदर दोन्ही बंब मोठे असल्यामुळे गल्लीबोळातील आग विझवितांना या विभागाच्या कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत होती. आता नव्याने ताफ्यात दाखल झालेला बंब हा छोटा वाहनावर असुन गल्लीबोळातही सहज फिरविता येऊ शकतो. अ्िग्नशम विभागात अत्याधुनिक आयुधांची भर पडल्यामुळे आता आपत्तीचा मुकाबला करणे नागरिकांसाठी सोपे झाले आहे.** वूडण कटरमुळे मिळणार तात्काळ दिलासापावसाळ्यात होणार्‍या वादळी वार्‍यात बर्‍याचवेळा झाडे उन्मळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. शिवाय जुनाट घरे पडुन आपत्ती उद्भवण्याचेही प्रकार घडतात. अश्यावेळी या वूडन कटरचा उपयोग होवू शकतो. रस्त्यावरील झाडांची कटाई करून नागरिकांना तात्काळ दिलासा देण्याचा हा रामबाण उपायच आहे.** फ्लोट पंप ठरणार आग विझवितांना गुणकारीआग लागलेल्या ठिकाणी पाण्याची टाकी , तळे, नदी, नाला असेल तर त्यातून पाणी खेचून आग विझविण्यासाठी फ्लोट पंप अत्यंत महत्वाची भूमिका निभवू शकतो. बंबातील पाणी संपल्यानंतर यापंपाचा उपयोग होवू शकतो. या पंपामुळे अग्निशमन दल आणखी सुसज्ज झाले आहे.

** अत्याधुनिक अग्निशमन बंब विझविणार आगपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात पॉवर स्टिअरिंग तथा विविध सोयींनी युक्त असलेला अग्निशमन बंब दाखल झाला आहे. यापंपावर पाणी फवारण्याची मुव्हेबल वॉटर गण आहे. तब्बल शंभर मिटर अंतरापर्यंत या गणमधून पाण्याचा फवारा करता येऊ शकतो. या अग्निशमन बंबावर माईकची व्यवस्थाही आहे.