शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण माहिती संकलित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : कोरोना महामारीमुळे अनेक बालकांना पालक गमावण्याची वेळ आली. अठरा वर्षांच्या आतील अनाथ बालकांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबत ...

वाशिम : कोरोना महामारीमुळे अनेक बालकांना पालक गमावण्याची वेळ आली. अठरा वर्षांच्या आतील अनाथ बालकांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शेतीच्या सातबारात वारस म्हणून त्यांच्या नावाचा समावेश करून पालकांचा बँकेत असलेल्या पैसा त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी या बालकांची संपूर्ण माहिती येत्या २० जूनपर्यंत संकलित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांनी १४ जून रोजी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोरोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.पी. देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ.जयश्री गुट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची उपस्थिती होती.

शण्मुगराजन एस. पुढे म्हणाले, कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाला आहे, अशा महिलांची माहिती संकलित करून त्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तहसीलदारांना प्रस्ताव सादर करावा. ज्या अनाथ बालकांकडे वडिलांची शेती असेल, तर त्या बालकांची शेतीचा वारस म्हणून सातबारावर नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. मृत्यू पावलेल्या पालकांचा बँकेत असलेला पैसा त्या बालकांना मिळावा, यासाठीही वारस म्हणून त्या बालकांची नोंद घेण्यात यावी. दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना त्यांच्या पालकांच्या नावे असलेली चल व अचल संपत्ती संबंधित बालकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य व सक्षम बालकांच्या पालनपोषणकर्त्या व्यक्तीकडे ठेवण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. सभेला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, चाइल्ड लाइनचे समन्वयक महेश राऊत, संरक्षण अधिकारी सर्वश्री. आलोक अग्रहरी, डी.पी.उचित, आर. एन. सुरजुसे, आर. जी. वानखडे यांची उपस्थिती होती.

००

अंगणवाडीसेविकेमार्फत सर्वेक्षण

कोविड १९ मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडीसेविकेमार्फत करण्यात आले. दोन पालक गमावलेली ५ बालके चार कुटुंबांत, तर एक पालक गमावलेले १८३ बालके ९४ कुटुंबांत आहेत. त्यापैकी ४४ बालकांची गृहभेट घेऊन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित १३९ बालकांची गृहभेट घेण्यात येत आहे. त्यांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले. आतापर्यंत ५८ बालकांचा सामाजिक अन्वेषण अहवाल चौकशी करून बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आला.