शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
6
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
7
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
8
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
9
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
10
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
11
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
12
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
13
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
14
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
15
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
16
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
17
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
18
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
19
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
20
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस -जनता समन्वयासाठी ‘कॉफी विथ पोलीस’ उपक्रम

By admin | Updated: July 7, 2017 01:21 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांची संकल्पना : सोमवारी पहिला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्याचा प्रभार स्वीकारल्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम तसेच प्रेरणादायी कार्यक्रम राबविले आहेत. त्यांच्या कल्पकतेतून जिल्ह्यात नवीन कार्यक्रमाचे पोलीस विभागाकडून आयोजन होत आहे. याच मालिकेत पोलीस जनता समन्वय साधण्यासाठी सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ‘कॉफी विथ पोलीस’ या नवीन संकल्पनेचे प्रयोजन केले आहे. या श्रृंखलेमध्ये समाजातील विविध घटकांसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, महिला, युवती व पत्रकार बंधु, तसेच विविध व्यावसायिक जसे डॉक्टर्स, वकील, खासगी व्यवसाय करणारे व्यापारी व समाजातील इतर घटकांसाठी क्रमाक्रमाने अशा कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक सौदार्हता निर्माण करण्यासाठी आयोजित केले जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम अभ्यासू व होतकरु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय याबाबत सखोल चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजात जुने पोलीस मुख्यालयात करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालविणाऱ्या जिल्ह्यातील संस्था, अभ्यासिकांचे संचालक, व्यवस्थापक यांनीही संस्थेतील विद्यार्थी जास्तीत जास्त या कार्यक्रमास पाठविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.