शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावती पुस्तकाअभावी पोस्टातील विज देयक भरणा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:18 IST

ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी वीजदेयक अदा करण्यासाठी सोयीचे असलेल्या टपाल कार्यालयात चार महिन्यांपासून पावती पुस्तकाचा अभाव आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची देयके रखडत असल्याने त्यांना देयक अदा करण्यास विलंब झाल्याप्रकरणी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

ठळक मुद्देमानोरा तालुक्यातील चित्र ग्रामीण वीजग्राहकांना चार महिन्यांपासून भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क 

इंझोरी : ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी वीजदेयक अदा करण्यासाठी सोयीचे असलेल्या टपाल कार्यालयात चार महिन्यांपासून पावती पुस्तकाचा अभाव आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची देयके रखडत असल्याने त्यांना देयक अदा करण्यास विलंब झाल्याप्रकरणी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक ग्रामस्थ शहरातील वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेत असून, त्यासाठीही त्यांना खर्च करावा लागत आहे. 

इंझोरी परिसरात वीज वितरणचे ५०० ते ६०० घरगुती विज ग्राहक आहेत. हे सर्व ग्राहक  दर महिन्याला गावातील टपाल कार्यालयात नियमित देयकाचा भरणा करतात. दर महिन्याला या ग्राहकांकडून जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचा भरणा केला जातो, मात्र मागील ४ महिन्यापासून येथील टपाल कार्यालयात आॅफीस मध्ये विज देयकाचा भरणा केल्यानंतर मिळणाºया पावतीचे पुस्तकच उपलब्ध नाही. त्यामुळे टपाल कार्यालयातून ग्राहकांना परत पाठविले जात आहे. वीज देयकास विलंब होऊ नये म्हणून येथील वीजग्राहक २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोरा शहरात वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेत आहेत. त्यासाठी खर्च करावा लागतोच शिवाय त्या ठिकाणी देयक अदा करणाºयांची संख्या मोठी असल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागते.  तथापि, देयक नियोजित तारखेला भरण्यात आले नाही, तर अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे. वीजग्राहकांची समस्या लक्षात घेऊन इंझोरी येथील टपाल कार्यालयात पावती पुस्तक उपलब्ध क रावे, अशी मागणी शेकडो वीजग्राहकांच्यावतीने करण्यात येत आहे.