वाशिम : नागपूर येथील डॉ. मुकेश चांडक यांचा आठ वर्षीय चिमुकला युग याचे अपहरण करून दहा कोटीची खंडणी मागणार्या क्रुरकम्र्याने हत्या केल्याची घटना २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ वाशिम शहरातील दंत शल्य चिकि त्सक डॉक्टरांनी जिल्हाध्यक्ष डॉ. माधुरी गजानन शिंदे यांच्या नेतृत्वात ३ सप्टेंबर रोजी हॉस्पिटल बंद ठेवून निषेध व्यक्त केला. नागपूर येथील छापरूनगर चौकाजवळच्या गुरूवंदना अ पार्टमेंट मध्ये राहणार्या डॉ. मुकेश चांडक यांना दोन मुले आहेत. हे दोघेही वाठोड्यातील सेंटर पॉईंट स्कुलमध्ये शिकत होते. १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सेंटर पॉईंट स्कुलच्या बसने युग घरी परतला. मात्र, तो घरात गेला नाही. बसमधून उतरताच अपार्टमेंट समोर स्कुटीवर असलेल्या एका अपहरणकर्त्याने त्याला स्वत:सोबत चलण्यास प्रवृत्त केले. तेथील चौकीदाराच्या खुर्चीवर दप्तर फेकुन तो अपहरणकर्त्याच्या गाडीवर बसून निघून गेला. २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताचे सुमारास खापरखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखाली युगचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, अपहृत युगची अपहरणकर्त्यांनी हत्या केल्याच्या वृत्ताने वैद्यकीय क्षेत्र अक्षरश: हादरवून सोडले. या घटनेच्या निषेधार्थ इंडीयन डेंटल मेडीकल असोसिएशन वाशिमच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी हॉस्पिटल बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी गजानन शिंदे यांनी दिली.
दंत चिकित्सकांचा कडकडीत बंद
By admin | Updated: September 4, 2014 00:26 IST