लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: सफाई कामगारांच्या विविध मागण्यांची पुर्तता न करण्यात आल्याने १२ जुलै रोजी अखिल भारतीय सफाई मजदुर कॉग्रेसच्यावतीने कारंजा येथील नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोल करण्यात आले. सफाई कामगाराच्या मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने नगरपरीषद प्रशाशनाशी वारंवार चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र, मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामूळे संघटनेच्या वतीने २८ जूनरोजी नगरपरीषद प्रशासनास निवेदनाद्वारे आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. त्यामध्ये ११ जूलैपर्यंत सकारात्मक कारवाई न झाल्याने १२ जूलैरोजी धरणे आंदोलन करण्यात आले. १४ फेब्रूवारी २०१७ रोजी सभागृहात चर्चा न करताच पारीत केलेल्या ठराव क्रमांक ३१ ची अंमलबजावणी थांबवावी, सफाई कामगारांचे वेतन व पेन्शन दरमहा ७ तारखेच्या आत करण्यात यावे यासह एकूण १८ मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.