शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ महाराष्ट्र अभियान लोकचळवळ व्हावी - राहूल व्दिवेदी

By admin | Updated: May 26, 2017 20:11 IST

मानोरा : येत्या १५ जुनपर्यंत मानोरा नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजे हे शक्य आहे. फक्त ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे. येत्या १५ जुनपर्यंत मानोरा नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजे हे शक्य आहे. फक्त ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी केले.मानोरा नगर पंचायतीच्या सभागृहात  स्वच्छ भारत अभियान सभेत अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष रेखाताई पाचडे, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक मोरे, स्वच्छ भारत अभियान नगर विकास कक्ष मंत्रालय मुंबईचे सुहास चव्हाण, नायब तहसीलदार तायडे, ठाणेदार मळघणे,  आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रथम मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पुजन केले.यावेळी आपल्या भाषणात व्दिवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद व नगर पंचायत १०० टक्क हागणदारीमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. चार न.प.झाल्या, मालेगाव न.प.चे ८० टकके काम झाले, मात्र मानोरा न.प. मागे आहे. केवळ २० टक्केच काम झाले. येत्या १५ जुनपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य क रुन हे काम १००  टक्के करायचे आहे असे झाल्यास संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होईल व राज्यात वाशिम जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागेल. कारण सिंधुदुर्ग जिल्हा घोषीत झाला आहे. स्टाफ नाही असे कारण पुढे करु नका, शौचालय बांधण्यासाठी स्टाफची गरज नाही. नगरसेवक व लाभार्थीनी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष रेखाताई पाचडे, दिपक मोरे, सुहास चव्हाण यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. नगरसेवक अमोल राऊत यांनी नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त करुन दाखवू असा विश्वास दिला. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शौचालय बांधणाऱ्या  सुफियाबी अब्दूल शब्बीर पानवाले, सरस्वताबाई साळवे, सखुबाई मनोहर कलीया, या महिलांचा जिल्हाधिकारी याचेहस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केल. ६१९ अर्ज लाभार्थींचे आले पैकी १२८ शौचालय पूर्ण झाले. १८८ चे काम प्रगतीपथावर आहे असेही त्यांनी सांगितले. येत्या १५ जुनपर्यंत सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले तर निश्चित टार्गेट पूर्ण करु असा विश्वास त्यांनी दिला.  संचालन माळकर यांनीच केले. बांधकाम अभियंता अमोल राठोड यांनी आभार व्यक्त केले.