शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोनाकाळात २१६ मेट्रिक टन जैविक कचरा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST

वाशिम शहरात २५ घंटागाड्यांसह ८ ट्रॅक्टरद्वारे जैविक कचऱ्याचे संकलन केल्या जाते. काेराेनापूर्वी वाशिम शहरात १८ ते २० मेट्रिक टन ...

वाशिम शहरात २५ घंटागाड्यांसह ८ ट्रॅक्टरद्वारे जैविक कचऱ्याचे संकलन केल्या जाते. काेराेनापूर्वी वाशिम शहरात १८ ते २० मेट्रिक टन कचरा संकलित व्हायचा. मार्च महिन्यानंतर या कचऱ्यात २२ टक्क्यांनी वाढ हाेऊन प्रतिदिन ५ मेट्रिक टन कचरा वाढल्याचे दिसून येत आहे. काेराेनाकाळातील ९ महिन्यांमध्ये प्रतिदिन २४ ते २५ मेट्रिक टन कचऱ्यानुसार ९ महिन्यांमध्ये २१६ मेट्रिक टन खत संकलित करण्यात आले. जे काेराेनापूर्वी ९ महिन्यांचा विचार करता १८० मेट्रिक टन हाेते. यामध्ये ३६ मेट्रिक टनाने वाढ झाल्याचे दिसून येते. वाशिम शहरामध्ये नगर परिषदेच्यावतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर काेणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यासंदभार्त संबंधितांशी चर्चा केली असता कचरा टाकणारा व्यक्ती दिसून येत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यापासून याबाबत माेहीम सुरू करण्यात आली असून दंडात्मक व फाैजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले

.............

जैविक कचरा फेकणाऱ्यांना दंड नाही

जैविक कचरा काेणी समाेर टाकत नसल्याने कारवाई काेणावर करावी. कचरा रस्त्यावर पडलेला दिसून आल्यानंतरही तसेच आजूबाजूला विचारणा केल्यानंतरही कचरा आमचा नसल्याचे सांगण्यात येते यामुळे कारवाई काेणावर करावी, हा प्रश्न आहे. यामुळे काेणतीच कारवाई झालेली नाही .

............

काेराेनाकाळात दरमहा वाढला ५ टन कचरा

काेरानापूर्वी दरमहा २० टन कचरा नगर परिषदेतर्फे जमा केला जायचा. मार्चपासून लाॅकडाऊन व काेराेनाकाळामध्ये दरमहा २४ ते २५ टन कचरा जमा झाला. यामध्ये प्रत्येक महिन्याला ४ ते ५ टन कचऱ्यात वाढ झाल्याची माहिती नगर परिषदेच्या आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

...........

काेराेनाचा संसर्ग पाहता नग रपरिषदेतर्फे घंटागाडीद्वारे जैविक कचरा संकलन केला जातो. काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यांच्यावर न.प.तर्फे जानेवारी महिन्यापासून दंडात्मक व फाैजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

- जितू बढेल,

आराेग्य निरीक्षक, न.प., वाशिम