शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे आधार नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:26 IST

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याने आधार नोंदणीसाठीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोडसह जिल्ह्यात आधार नोंदणी केंंद्रांचा प्रश्न निकाली निघाला नसून, आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. रिसोड शहरात पोस्ट आॅफिस कार्यालयासमोर दररोज रांग लागत असतानाही याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. अनेक नागरिक तसेच विद्यार्थी हे आधार कार्डपासून वंचित आहेत. आधार नोंदणीसाठी जिल्ह्यात अत्यल्प नोंदणी मशिन पुरविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत ही सुविधा उपलब्ध केली आहे. परंतू, राष्ट्रीयकृत बँकेतदेखील आधार नोंदणीची सुविधा नियमित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दोन महिन्यापूर्वी रिसोड शहरात आधार कार्डची नोंदणी करण्यासाठी एकमेव डाक कार्यालयात (पोस्ट आॅफिस) सुविधा उपलब्ध होती. मध्यंतरी तांत्रिक बिघाडामुळे सदर मशिन बंद पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे लक्ष दिल्याने शेवटी पोस्ट आॅफिसमध्ये आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली. अन्य ठिकाणी आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध नसल्याने आधार नोंदणीसाठी पिूरता गोंधळ उडत आहे. अशीच परिस्थिती वाशिम, मालेगाव यासह अन्यत्र देखील आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २० पेक्षा अधिक ठिकाणी आधार मशिन पुरविण्यात आल्या. परंतू, चालान व अन्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्याने आधार नोंदणीसाठीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येते. याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :RisodरिसोडwashimवाशिमAdhar Cardआधार कार्ड