मालेगाव तालुक्यात कोविड सेंटर उभारले, तर वाशीमवरील ताणसुद्धा कमी होणार आहे आणि मालेगाव तालुक्यातील रुग्णांना येथे सुविधा मिळणार आहे; मात्र कोविड सेंटर करण्यासाठी मुख्य अडचण डॉक्टर्स, नर्स, ऑक्सिजन यांची असल्याचे तहसीलदार रवी काळे यांनी सांगितले. कोविड सेंटरसाठी नागरिकही सरसावले असून, अनेकांनी शनिवारी तहसीलदार व तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन पाठविले आहे. शिवशक्ती मित्रमंडळातर्फे मोहन पिराजी वानखेडे, सुनील भुरे, जगगनाथ रंजवे, ऋषिकेश सारस्कर, संतोष बाजड, भूषण साठे, गोपाल सातपुते, शिवराज मंडळतर्फे अभी घुगे, अमोल अंभोरे, अंकुश गुजरे, भाजपतर्फे संतोष तिखे, सुनील शर्मा, जनविकास आघाडीर्फे उपसरपंच अयुब, शहर अध्यक्ष मो.जफर ,ढोके, पप्पू कुटे, किशोर शिंदे, निसार भाई,याकुब भाई,अतिष बोकन उपस्थित होते. यावेळी मालेगांव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झाल्याने कोविड केअर सेंटर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात यावे याकरिता निवेदन देण्यात आले.
००
राजकीय नेते दूरच...
मालेगाव तालुक्याच्या या मुख्य मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येत असताना, राजकीय नेते मात्र दूर असल्याचे आज बघावयास मिळाले. राजकीय नेत्यांनीसुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत..