शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

बाल कामगारांचा शोधच नाही!

By admin | Updated: June 12, 2014 21:36 IST

मोहिमेने जवळपास ८२ व्यापारी संस्था व दुकांनामध्ये छापे टाकले. मात्र, केवळ एक बालकामगार हुडकून काढण्यात या मोहिमेला यश मिळाले.

वाशिम: जिल्हा बालकामगार कार्यालयाच्या वतीने संपूर्ण वाशिम जिल्हयात सन २0१३-२0१४ बालकामगार शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेने जवळपास ८२ व्यापारी संस्था व दुकांनामध्ये छापे टाकले. मात्र, केवळ एक बालकामगार हुडकून काढण्यात या मोहिमेला यश मिळाले.प्रत्यक्षात जिल्हयामध्ये बालकामगारांची संख्या खुप मोठी आहे. ही बाब धक्कादायक असून बालकामगार कार्यालयाच्या वतीने संपूर्ण जिल्हयातच बालकामगार शोध मोहीम वेळोवेळी राबविण्याची गरज आहे. वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हयामध्ये दुकाने, व्यापारी संस्था, लॉजिंग, हॉटेल्स सिनेमा थियेटर नाटयगृह या अंतर्गत एकूण १ हजार ११४ संस्था तसेच सदर संस्थामध्ये एकूण ३ हजार २२ कामगार असल्याची अधिकृत नोंदणी संबंधित विभागाकडे करण्यात आलेली आहे. या शिवाय कामगार नसलेल्या एकूण ५ हजार ९७१ संस्थाचीसुद्धा अधिकृत नोंद झालेली आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण जिल्हयात सर्वत्र ठिकठिकाणी बालकामगार काम करीत असतानाचे चित्र पहावयास मिळत असून या बाबीकडे शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. वाशिम शहरामध्ये ५४३ दुकांनामध्ये ८४0 कामगार, कर्मशियल तसेच बँका व अन्य व्यापारी संस्था असलेल्या ३६३ संस्थानमध्ये १४५ कामगार, १२३ हॉटेल्स मध्ये ३४५ कामगार, ५लॉगींग ९, ४ नाटयगृह सिनेमा थियेटरमध्ये २१ कामगार प्रत्यक्ष कामावर असल्याची नोंद असून २ हजार २६६ असलेल्या सर्व संस्थानमध्ये एकही कामगार वाशिम जिल्हयातील कारंजा व मंगरुळपीर तालुक्यामध्येच दुकाने व संस्था अधिनियम कायदा लागू असून कारंजा येथील सर्व ४९३ नोंदणीकृत संस्थामध्ये ११९२ कामगार तर मंगरुळपीर येथील २६३ संस्थामध्ये ४७९ कामगार असल्याची नोंद आहे कारंजा येथील २६९१ व मंगरुळपीर येथील १0२४ दुकाने व संस्थामध्ये कामगार नसल्याची नोंद आहे. जिल्हयातील रिसोड, मालेगाव, मानोरा या तालुक्यांमध्ये शॉपअँक्ट कायदा लागू नसल्यामुळे या तिनही तालुक्यांमध्ये बालकामगारांची संस्था मोठया प्रमाणात आहे वाशिम हे जिल्हयाचे मुख्यालय असून अकोल्याचे कामगार अधिकारी प्रशांत महल्ले यांच्याकडे वाशिम व बुलडाणा जिल्हयाचा प्रभार आहे. दुकान व संस्था अधिनियम कार्यायाचे कारकून खान व आत्माराम धनकर यांच्यावर वाशिम कार्यालयाची भिस्त असून दुकान निरीक्षकाचे पद रिक्त आहे. शिवाय दुकान संस्था सह कामगार कल्याण मंडळ तसेच घरेलू कामगार व इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणीचा अतिरिक्त भार खान व धनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे वाशिम जिल्हयात बालकामगार शोध पथक मोहीम वारंवार राबविण्याची गरज असून ठिकठिकाणी बालकामगारांच्या हक्कासाठी व न्यायासाठी चर्चा सत्रे, मेळावे, जगनजागरण व बालकामगार शोध पथक मोहीम राबविणे आवश्यक आहे.