लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाने सन २००९ पासून थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै रोजी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' घेवून महत्वाच्या मुद्यांवर अधिका-यांशी संवाद साधला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री, महसूल मंत्री, पणन मंत्र्यांसह इतर तीन विभागाचे मंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, सहा विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, सहकार आयुक्त, मंत्रालयातील उपसचिव, विभागीय आयुक्त, राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकाँचा एक प्रतिनिधी आदिंसोबत मुख्यमंत्र्यांनी ह्यव्हि.सी.ह्णवर संवाद साधून कर्जमाफीसंदर्भातील अडचणींबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी 'व्हीसी'द्वारे साधला अधिका-यांशी संवाद!
By ram.deshpande | Updated: July 25, 2017 20:29 IST
वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै रोजी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' घेवून महत्वाच्या मुद्यांवर अधिका-यांशी संवाद साधला.
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी 'व्हीसी'द्वारे साधला अधिका-यांशी संवाद!
ठळक मुद्देकर्जमाफीसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणींवर केले मार्गदर्शन