शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ६३१ गावांमध्ये ‘चावडी वाचन’ पूर्ण!

By admin | Updated: June 11, 2017 13:56 IST

९ जूनअखेर त्यातील ६३१ गावांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.

वाशिम : राज्यशासनाच्या महत्त्वाकांक्षी ह्यडिजिटल इंडियाह्ण या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८०९ गावांमध्ये तीन टप्प्यात विशेष चावडी वाचन मोहिम राबविण्यात येत असून ९ जूनअखेर त्यातील ६३१ गावांमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. शेतकऱ्यांना अद्ययावत तथा बिनचूक सात-बारा देणे, हा या उपक्रमामागील मूळ हेतू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सन २००८ पासून सात-बारा अद्ययावतीकरणासह शेतकऱ्यांच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या दस्तावेजातील त्रुट्या दुर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ह्यडिजिटल इंडियाह्ण या अभिनव उपक्रमांतर्गत अद्ययावतीकरण पूर्ण झालेले सात-बारा दस्तावेज केवळ एका क्लिकवर ह्यआॅनलाईनह्ण उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तत्पूर्वी शेवटचा हात म्हणून जिल्हा प्रशासनाने वाशिम जिल्ह्यातील महसूली विभागातील ८०९ गावांमध्ये चावडी वाचन मोहीम राबविणे सुरू केले असून यामाध्यमातून त्या-त्या गावातील तलाठ्यांकडून सात-बारा वाचन करून संबंधित शेतकऱ्यांच्या नावात, जमिनीच्या क्षेत्रफळात किंवा इतर काही त्रुट्या असल्यास त्या तत्काळ दुर केल्या जात आहेत. ८०९ पैकी ६३१ गावांमध्ये ही मोहिम पूर्ण झाली असून येत्या १५ जूनपर्यंत उर्वरित गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी सांगितले.