शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची उत्साहात सांगता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:53 IST

वाशिम: तीन वर्षे तीन महिण्यात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करणा-या दिवंगत पंडितकाका धनागरे महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ आॅक्टोबरपासून येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता ३ नोव्हेंबरला करण्यात आली.

ठळक मुद्देशोभायात्रेत हजारो भाविकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग वासुदेव आश्रमात आज महाप्रसादाचे आयोजन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तीन वर्षे तीन महिण्यात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करणा-या दिवंगत पंडितकाका धनागरे महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ आॅक्टोबरपासून येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता ३ नोव्हेंबरला करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अमृत महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांच्या साक्षीने पुणार्हूतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रामुख्याने गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास, करवीर पिठाचे शंकराचार्य वेदमूर्ती विद्यानृसिंह भारतीय स्वामी महाराज, माधवानंदतिर्थ यती महाराज, गणेश्वरशास्त्री द्राविड, राजेश्वरशास्त्री जोशी, कृष्णशास्त्री आर्वीकर, विश्वनाथ जोशी, विजयकाका पोफळी महाराज यांची उपस्थिती होती. यांचे पूजन झाले.यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराज म्हणाले की, जगाचे कल्याण होण्यासाठी वेदांचे अध्ययन होणे गरजेचे आहे. सुख मिळविण्याची धडपड म्हणजेच जीवन आहे. मानवी जिवनाचा सखोल व व्यापक विचार वैदिक संस्कृतित दडलेला असल्याने ही संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे त्यांनी सांगितले. उपस्थित इतर मान्यवरांनीही भाविकांचे उद्बोधन केले. शुक्रवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाशिम नगरीत शोभायात्रा निघाली असता, वाशिमकर जनतेने पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले. दरम्यान, चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता झाल्यानिमित्त शनिवार, ४ नोव्हेंबरला वाशिमच्या वासुदेव आश्रमात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.