शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अनुदानित तुकडीवरही शुल्क आकारणी

By admin | Updated: July 15, 2017 01:54 IST

कारंजा पालिकेचा ठराव : गोरगरीब विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड: येथील नगर परिषदेच्या मुलजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतील प्रवेशाचे निकष ठरवताना ३ हजार रुपये शुुल्क आकारण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. नियमानुसार अशा अनुदानित तुकडीवर शुल्क आकारणी करता येत नाही; परंतु पालिकेच्या ठरावामुळे आता गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.सामान्य विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. तेव्हा गरीब व होतकरू विद्यार्थी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कनिष्ठ महाविदयालयात प्रवेश घेतात; पण या वर्षी नगर परिषदेने अजब ठराव घेतला आहे. या ठरावानुसार शाळेला ३ हजार रुपये शुल्क आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे गरीब दलित व अल्पसंख्याक होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा फज्जा उडाला आहे.वास्तविकत: गरीब दलित व अल्पसंख्याक विद्याथ्यार्साठी मोफत शिक्षणाची व्यवस्था नगर परिषदेने करायला हवी होती; परंतु तसे न करता उलटपक्षी शुल्क आकारणी करून शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी व मराठीसाठी एक शिक्षक व जीवशास्त्र शिकविण्यासाठी एक शिक्षक कार्यरत आहे. विज्ञात शाखेत महत्त्वाचे मानले जाणारे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांच्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनंतर जागा रिक्त झालेल्या आहे. त्या नगर परिषदेने अद्यापही भरलेल्या नाहीत. अपुरा शिक्षक वर्ग असतानाही अतिरिक्त तुकडी घेण्याचा उत्साह मात्र नगर परिषदेने दोन वर्षाआधी दाखविला आहे. एक अनुदानित व दोन विनाअनुदानित तुकड्यांना खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक शिकवतात. या शिक्षकांच्या पात्रता शंकास्पद आहे. २२५ विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा, प्रयोगशाळा आदी संसाधने नसतानाही प्रवेश देऊन त्यांच्या भवितव्याशी गंभीर खेळ खेळला जातो. एवढेच नव्हे तर प्राचार्य मेश्राम यांच्या निवृत्तीनंतर गतवर्षापर्यंत नियमित प्राचार्याशिवाय महाविद्यालय व शाळा चालविण्याचे कामही पालिकेने केले आहे. या वर्षी मुख्याधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे प्राचार्य पदाची नियुक्ती झाली. संपूर्ण विद्याालयात १,१०० पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेत १८ शिक्षकांची कमतरता असताना शिक्षणाचा रथ नगर परिषदेचे समर्थ हात ओढत आहे. या संबध व्यवस्थेची जिल्हाधिकारयांनी दखल घेऊन या प्रकाराची चौकशी करावी, अशी पालकांची मागणी आहे. दरम्यान, या महाविद्यालयात शिक्षक भरती प्रक्रिया होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांना शिकविण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. शिकवणी वर्ग चालविणारे चार शिक्षक येथे नियमित शिक्षकांसारखे काम करीत आहे. मुलाखत होण्यापूर्वीच या शिक्षकांना काम सोपविल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नगर परिषदेने शुल्क आकारणीचा ठराव घेऊन मुख्याध्यापक यांच्याकडे पाठविला त्याबाबत आपल्याला काही सांगता येणार नाही.- प्रमोद वानखडेमुख्याधिकारी न.प. कारंजाआम्हाला नगर पालिकेकडून ठराव प्राप्त झाला आहे. त्यांच्या ठरावानुसार आम्ही विद्यार्थ्यांना ३ हजार शुल्क आकारत आहोत.- रमेश निशानराव मुख्याध्यापक मुलजी जेठा कनिष्ठ महाविद्यालय