शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

लाखोंचे श्रद्धास्थान गोवर्धन येथील चंदनशेष मंदिर

By admin | Updated: August 1, 2014 02:18 IST

नागपंचमी विशेष रिसोड तालुक्यातील देवस्थान

निनाद देशमुख /रिसोडरिसोडपासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावरील गोवर्धन गाव. या गावाजवळ ढोणगाव रस्त्यावर चंदनशेष महाराजांचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी नागपंचमीनिमित्त जवळपास एक लाख भाविक गोवर्धन या गावी येथून नागदेवतांच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरिता येत असतात. जिल्हय़ातील तसेच जिल्हय़ाबाहेरील चंदनशेष महाराजांचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराबाबत गावातील ज्येष्ठ लोकांच्या अनुभवानुसार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रावजी बापू वाघ हे नागपंचमीच्या दिवशी शेतात जमिनीची मशागत करीत असताना त्यांना निगरुडीच्या झाडाखाली साप चावला होता; परंतु त्यांचे विष उतरुन ते जिवंत राहिले. जवळपास पंधरा दिवसानंतर नागदेवता त्यांच्या स्वप्नामध्ये आली. तिने नागदेवतेचे मंदिर स्थापन कर, असा उपदेश दिला. यापुढे त्यांनी तेथे नागदेवता स्थापून चंदनशेष महाराज या नागदेवतेची मनोभावे सेवा केली, अशी अख्यायिका आहे. त्यांच्या घरातील जवळपास तीन पिढय़ानपासून ही सेवा कायम चालविली जात असल्याचे गावातील नागरिक रमेशराव वाघ यांनी सांगितले. पुढे नागोराव वाघ यांनी मंदिराची उभारणी केली.निसर्गसौंदर्यांनी वेढलेल्या मंदिराच्या समोरच जुने वडाचे झाड असून, पंचक्रोशिसह परजिल्हय़ातीलही कोणालाही सर्पदंश झाल्यास त्यांनी डोळय़ावर दगड ठेवल्यास किंवा जात्याची पाळ देऊन मागे न पाहता चंदनशेष महाराजांकडे गेले तर विषाचा उतारा होऊन माणूस जिवंत राहतो, अशी या परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे.फार वर्षांपूर्वी या ठिकाणी घनदाट जंगलात फार मोठे वारुळ होते. या गावातील लोक आपल्या घरामध्ये साप निघाल्यास मंदिर परिसरातील वाळू आणून घराभोवती टाकल्यास साप घरात येत नाही, असे येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशी या गावात शेतातील कुठलेही मशागतीचे काम ग्रामस्थ करीत नाहीत. शेतात मशागतीचे काम केल्यास नागदेवतेला इजा होऊ शकते, असे गावातील लोक सांगतात. नागपंचमीच्या दिवशी येथे रिसोड तालुक्यासहित अकोला, बुलडाणा, परभणी, हिंगोली या ठिकाणाहून जवळपास एक दीड लाख भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या निधीतून दोन सभा मंडपाची उभारणी झाली आहे. यात्रेनिमित्त भाविकांची रेलचेल पाहून पोलिस प्रशासन बंदोबस्तासाठी तैनात असते. गावातील नायबराव वाघ व सदाशिवराव वाघ हे आपला वारसा प्रमाणे मंदिराची अखंड सेवा करीत असतात. चंदनशेष महाराजांचे हे मंदिर पंचक्रोशितील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.