शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख पक्षांसमोर बंडखोरी शमविण्याचे आव्हान

By admin | Updated: August 25, 2014 01:56 IST

वाशिम जिल्ह्यातील इच्छुकांची काढावी लागणार समजूत; बंडखोरीवर नियंत्रणासाठी पक्षांना करावी लागणार कसरत.

दादाराव गायकवाड / वाशिमवाशिम: जिल्हय़ातील कारंजा, वाशिम आणि रिसोड तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यामुळे तिकीट वाटपाचा पेच निर्माण झाला असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजांच्या संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्याकडून आपापल्या परीने दावेदारीही करण्यात आली. जिल्हय़ातील तिन्ही मतदारसंघात आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत अशा इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे तिकीट वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये आजी-माजी आमदारांसह नवख्यांचाही समावेश असून, प्रत्येक इच्छुक पक्षश्रेष्ठीमधील आपल्या पाठीराख्याकडून स्वत:ची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे तिकीट द्यायचे तरी, कोणाला, हा प्रश्न गंभीर रूप धारण करू लागला आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही तिकीट मिळाली नाहीच, तर नाराज झालेले काही इच्छुक बंडखोरीचे हत्यार उपसणार हेसुद्धा निश्‍चित आहे. या बंडखोरीला आळा घालण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १२, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १२, भाजपाच्यावतीने १५ उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीमधील घटकपक्ष शिवसेनेकडे असलेल्या कारंजा विधानसभा मतदारसंघांत त्यांच्यावतीने १५ जण इच्छुक आहेत. वाशिम व रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेतर्फे इच्छुकांचे नाव पुढे आले नसल्याची माहिती आहे. जिल्हय़ातील सध्याच्या स्थितीनुसार वाशिम आणि रिसोड मतदारसंघ संपुआमधील काँग्रेसकडे, तर हेच दोन मतदारसंघ महायुतीमधील मुख्य घटकपक्ष असलेल्या भाजपकडे आहेत. कारंजा मतदारसंघ महायुतीमधील शिवसेनेकडे, तर संपुआमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. इच्छुकांची संख्या लक्षात घेतल्यास वाशिम मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक ३२, तर तर त्या खालोखाल भाजपचे ७ उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात या दोन पक्षांनाच नाराजांचा अधिक सामना करावा लागेल. कारंजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक १५, तर त्या खालोखाल काँग्रेसचे ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ उमेदवार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असताना त्यांचे मात्र ५ इच्छुक आहेत. रिसोड मतदारसंघ संपुआमधील काँग्रेसच्या वाट्यावर असून, या मतदारसंघात त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार, तर भाजपचे तीन इच्छुक उमेदवार आहेत.