शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांपुढे ‘एक गाव एक गणपती’ चे आव्हान

By admin | Updated: August 27, 2014 00:19 IST

शासनाच्या माहिमेला भक्तांचा मिळाला वेळोवेळी प्रतिसाद

मानोरा : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडेगावात शांतता राखण्याच्या दृष्टीने ह्यएक गाव एक गणपतीह्ण उपक्रम राबविणे महत्वाचे असून हा उपक्रम राबविण्याचे आव्हान तंटामुक्त समित्यांपुढे उभे ठाकले आहे. गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. मागील सात वर्षात या मोहिमेला मोठे यशही मिळत आहे. गावातील तंटे गावात मिटवून शांतता व सुव्यवस्था निर्माण होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीसांवर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा ताण असतो. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. एका गावात एकच गणपती स्थापन केल्यास गावातील शांतता भंग होणार नाही. मानोरा शहरासह तालुक्यात मोठय़ा प्रमाणात गणेश मंडळ स्थापन केले जातात. गावागावात एकापेक्षा अधिक गणेश मंडळाची स्थापना होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन गावातील तरूणांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गावात एकच गणपती असेल तर गटबाजी निर्माण होणार नाही. वादविवाद टाळले जातील. गावाची शांतताही भंग होणार नाही. परिणामी गावाची सामाजिक, सांस्कृतिक ओळख निर्माण होईल. यासाठी एक गाव एक गणपती यावर भर देण्याची गरज आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही लोकचळवळ आहे. या चळवळीच्ी धुरा खांद्यावर घेणार्‍या कार्यकर्त्यांना गावात तंटामुक्तीसाठी उपाय करावयाचे आहे. त्यातीलच एक गाव एक गणपती हा महत्वाचा उपक्रम आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाला खंबिरपणे या तंटामुक्त समित्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. अनेक गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू करावा. तंटामुक्त गाव समिती आणि गावकर्‍यांच्या सहकार्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रमाने गावकर्‍यांचे मतपरिवर्तन होईल या कुणालाही शंका नाही.