शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड बाजार समितीचे सभापती उगले पायउतार

By admin | Updated: October 30, 2014 00:20 IST

संचालक पदावरील स्थगिती फेटाळली.

रिसोड (वाशिम): रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामराव उगले यांच्या संचालक पदावरील स्थगिती फेटाळल्याचे राज्याच्या पणन मंत्र्यांचे १२ सप्टेंबरचे आदेश २७ ऑक्टोबर रोजी रिसोडमध्ये धडकल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तत्कालिन सभापती गजानन पाचरणे आणि सभापती श्यामराव उगले यांनी एकमेकांविरूद्ध जिल्हा उपनिबंधक वाशिम, विभागीय सहकार आयुक्त अमरावती, पणन कृषी मंत्री मुंबई, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आदी न्यायालयात प्रकरण समाविष्ठ केले होते. अपात्रतेचे आदेश आणि स्थगिती असे निर्णय दोन्ही बाजूंनी लागत होते. पाचरणे यांनी ४ डिसेंबर २0१३ रोजी उगले हे सेवा सहकारी सोसायटी , धोडप या संस्थेचे सदस्य नसल्यामुळे त्यांना बाजार समितीच्या संचालक व सभापतीपदी राहण्याचा अधिकार नियमबाहय आहे, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक वाशिम यांच्याकडे दाखल केली. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक वाशिम यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन ५ फेब्रुवारी २0१४ रोजी संचालक व सभापतीपदावरुन उगले यांना कमी केल्याचा आदेश पारित केला होता. या विरोधात श्यामराव उगले यांनी विभागीय सहकार आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल करुन पुन्हा स्थगिती मिळविली होती. प्रकरण नंतर राज्याच्या पणन मंत्र्यांच्या दरबारात गेले होते. पणन मंत्र्यांनी सदर प्रकरणाची तपासणी करुन जिल्हा उपनिबंधक वाशिम व सहकार आयुक्त अमरावती यांचे आदेश कायम ठेवून उगले यांना दिलेली स्थगिती १२ सप्टेंबर २0१४ ला फेटाळली. सदर आदेश २७ रोजी जिल्ह्यात धडकल्याने उगले यांना पायउतार व्हावे लागले.