शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीला केंद्राचा नकार; लाखो क्विंटल तूर घरात पडून!

By admin | Updated: June 19, 2017 04:14 IST

व्यापा-यांना करावी लागणार तूर खरेदी; कमी दर दिल्यास होणार कारवाई.

लोकमत न्यूज नेटवर्कसुनील काकडे वाशिम: कुठलाही शेतमाल उत्पादित झाल्यानंतर व्यापार्‍यांकडून आर्थिक लूट अथवा पिळवणूक होत असल्यास हमीदर जाहीर करून जास्तीत जास्त २५ टक्के माल शासन खरेदी करते. असे असताना यंदाच्या हंगामात शासनाने ४0 ते ४५ टक्के तूर खरेदी केली. त्यामुळे यापुढे तूर खरेदीस मंजूरी देता येणार नाही, असे केंद्रशासनाने राज्यशासनाला स्पष्ट केल्याने खरेदीअभावी घरातच पडून असलेल्या लाखो क्विंटल तुरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना वाशिम येथील सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले, की दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील अधिकांश जिल्ह्यांमध्ये तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यातुलनेत मात्र बाजार समित्यांमध्ये तुरीला अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्याने शासनाने ह्यनाफेडह्णमार्फत फेब्रूवारी २0१७ पासून ५0५0 रुपये प्रतिक्विंटल हमीदराने तुर खरेदीस प्रारंभ केला. ही प्रक्रिया १0 जूनपासून थांबविण्यात आली; परंतू १५ ते ३१ मे दरम्यान बाजार समित्यांच्या माध्यमातून ह्यटोकनह्णपद्धतीने नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांची लाखो क्विंटल तूर अद्याप खरेदी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात राज्यशासनाने केंद्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून शिल्लक असलेली तूर खरेदी करण्याची विनंती केली. मात्र, धोरणात्मक निर्णयाचे संदर्भ देत केंद्राने ही विनंती फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे टोकन मिळूनही तुर खरेदीची प्रतीक्षा करणार्‍या लाखो शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. ५0५0 पेक्षा कमी दर देणार्‍या व्यापार्‍यांवर फौजदारी!केंद्रशासनाच्या नकारानंतर शेतकर्‍यांकडे पडून असलेली लाखो क्विंटल तूर बाजार समित्यांच्या माध्यमातूनच व्यापार्‍यांकरवी खरेदी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. व्यापार्‍यांना तूरीला किमान ५0५0 रुपये प्रतिक्विंटल दर द्यावे लागतील, त्यापेक्षा कमी दर दिल्यास संबंधित व्यापार्‍यावर फौजदारी स्वरूपातील गुन्हे दाखल होवू शकतात, अशी माहिती वाशिम येथील सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ह्यलोकमतह्णला दिली.