यावेळी सिध्दार्थ देवरे , मोहन महाराज राठोड यांनी जिजाऊंचा आदर्श हा समस्त देशभरातील स्त्रियांनी घ्यायला हवा असे मत व्यक्त केले. सर्व प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले , त्यानंतर त्यांच्या महान कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यात आला . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, जि. उपाध्यक्ष समाधान भगत, जि.उपाध्यक्ष मोहन महाराज, जि.सचिव विनोद भगत, जि.सचिव राजाभाऊ चव्हाण, प्रा.राजु आडे, तालुका निरीक्षक भारत भगत, तालुकाध्यक्ष नागेश पाटील, शहराध्यक्ष सचिन खांडेकर, ता.महासचिव देवानंद कांबळे, शहर उपाध्यक्ष विलास डोंगरे, ता.सचिव चंद्रमणी लांजेवार, ता.सचिव बबन वानखडे, शहर सचिव मनोहर श्रीराव, किस्मत इंगोले, शालिकराम अघम, अकील चौधरी, भीमराव सोनोने, भाऊराव मोहाळे, बाबाराव खडसे, प्रकाश बागडे, प्रभुदास पाढेन, आरिफ प्यारेवाले, प्रशांत डेरे, भगवान शिंदे. यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीच्या वतिने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST