याप्रसंगी युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजमल वहीद यांनी कोविड-१९ पासून संरक्षण करण्यासाठी युनानी औषधी कसे उपयुक्त आहे हे सांगितले. तसेच उपस्थित डॉक्टरांनी युनानी औषधीविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जाधव व डॉ. अमजद खान, औषधनिर्माण अधिकारी जावेद फारूकी, केशव पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती तिडके, आयुष वै. अधिकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ अजमल, डॉ. तिडके, प्रकाश संगत,शरद गावंडे, बाबू साहब, श्रीमती सोळंके, किरण भगत, सीमा कांबळे, शालिनी प्रधान, राजू महाले, महेश बरगजे , काजले, अविनाश अवसरे, संजू संगत, श्रीमती गेंड यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण रुग्णालयात युनानी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST