शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सतर्कतेने सिलिंडरमधून गॅसची चोरी उघड

By admin | Updated: August 9, 2014 01:19 IST

वाशिम येथील काळे फैलातील घटना : दोघांविरूद्ध कारवाई.

वाशिम : ग्राहकाला घरपोच सिलिंडरची पोच देण्याचे काम करणारा ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराला सिलिंडरमधून गॅसची चोरी करताना नागरिकांनी रंगेहात पकडले. ही घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. येथील मिलिंद गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना सिलिंडरची घरपोच सुविधा देण्यासाठी मांगीलाल बिश्नोई नावाच्या युवकाला खासगी वाहनाद्वारे कंत्राट दिले होते. मांगीलाल व त्याचा एक साथीदार मनोज बिश्नोई (दोघेही रा. राजस्थान ह.मु. वाशिम) यांनी वाहनामध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये एका लोखंडी नळीद्वारे गॅस चोरी करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. त्यांचा हा गोरखधंदा वाहनामध्येच बसून चालत होता. आज ८ ऑगस्ट रोजी काळे फैल येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा गोरखधंदा उघडकीस आला. नागरिकांनी मांगीलाल व त्याचा एक साथीदार या दोघांनाही रिकाम्या सिलिंडरमध्ये नळीद्वारे गॅस भरताना रंगेहात पकडले; मात्र मांगीलालचा साथीदार घटनास्थळाहून पसार होण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती नागरिकांनी मिलिंद गॅस एजन्सीचे संचालक माणिकराव सोनोने व वाशिम शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सिलिंडर २४ गॅस सिलिंडरने भरलेला ऑटो जप्त करून केला. या घटनेची गॅस एजन्सीचे संचालक माणिकराव सोनोने यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. या फिर्यादीहून पोलिसांनी मांगिलाल बिश्नोई व मनोज बिश्नोई यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ४२0, ४0६, ४८९, २८५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.