शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमध्ये रोखीचा तुटवडाच

By admin | Updated: June 5, 2017 19:00 IST

वाशिम: केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन कल्लोळ अद्यापही कायमच आहे. बँकांमध्ये रोखीचा तुटवडा असल्याने अनेक व्यवहार अडचणीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन कल्लोळ अद्यापही कायमच आहे. बँकांमध्ये रोखीचा तुटवडा असल्याने अनेक व्यवहार अडचणीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यामुळे सुरवातीचे चार महिने सर्वच स्तरातील जनता आणि व्यावसायिकांना रोखीच्या तुटवड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यानच्या काळात शासनाने दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतरही रिझर्व्ह बँकेकडून गरजेनुसार पतपुरवठा करण्यात येत नसल्याने बॅकिंग सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यवहारावर परिणाम झाला. बँकेतील रोखीच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि नोकरदार वर्गाला बसला आणि तो अद्यापही कायम आहे. शासनाच्या धोरणानुसार शासकीय नोकरदारांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने बँकेत जमा होते; परंतु बँकेत खात्यावर वेतनाची रक्कम जमा झाल्यानंतरही संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात विड्रॉल मिळत नाही. त्यामुळे त्यांचे इतर खासगी व्यवहार विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्गाचा विचार केल्यास मागील महिन्यापर्यंत सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीसह बाजार समितीत विकलेल्या धान्याचा चुकारा काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धनादेशाच्या स्वरूपात मिळत होता. तथापि, बँकेत रोकडच नसल्याने धनादेश वटविणेही अवघड होऊन बसले. ही परिस्थिती बव्हंशी अद्यापही कायमच आहे.