शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा वनपरिक्षेत्र भ्रष्टाचारप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी

By admin | Updated: July 7, 2015 01:22 IST

लोकमतच्या पाठपुराव्याचे यश; भ्रष्ट अधिका-यांचे धाबे दणाणले.

सुनील काकडे/वाशिम : जिल्ह्यातील कारंजा वनपरिक्षेत्रात सन २0१२-१३ व २0१४-१५ या कालावधीत झालेल्या विविध कामांमध्ये तब्बल ३ कोटी ७0 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला. याप्रकरणी लोकमतच्या सलग पाठपुराव्यामुळे संबंधित चौकशी अधिकार्‍यांनी प्राथमिक चौकशी केली. यासह कारंजाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न लावण्याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांकडे सूचनापत्र पाठविले आहे. वनसंरक्षण, निकृष्ट वनांचे पुनर्विरोपण, निसर्ग पर्यटन, वन्यपशू व निसर्ग संरक्षण तथा वनक्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी सन २0१२-१३ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून कारंजा वनपरिक्षेत्राला सुमारे १0 कोटी रुपये प्राप्त झाले होते; मात्र कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यू.ए.पठाण व त्यांच्या सहकार्‍यांनी कामे वाटपात तसेच प्रत्यक्ष कामात अनियमितता करुन भ्रष्टाचार केल्याची तक्रार धानोरा (ता. मंगरुळपीर) येथील राजेश वासुदेव चारखोड यांनी २१ एप्रिल २0१४ रोजी उपवनसंरक्षक, अकोला यांच्याकडे सबळ पुराव्यासह केली होती; मात्र त्याचा काहीच फायदा न झाल्याने यासंदर्भात पुन्हा ३ जुलै २0१४ आणि ८ ऑगस्ट २0१४ रोजी तक्रारी झाल्यानंतर मध्यंतरी वाशिम येथील सहायक वनसंरक्षक गांगुर्डे यांनी थातूरमातूर चौकशी केली. सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास वनक्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे या योजनेंतर्गत अनघड दगडी बांधाची कामे करण्यासाठी ५0 लाख रुपयाचा निधी मिळाला होता. या निधीतून मौजे शेंदुरजना, पाळोदी, सावरगाव, पांगरा, मेंद्रा, खापरदरी आदी ठिकाणी अनघड दगडी बांधाची कामे उरकल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले आहे; मात्र यापैकी अध्र्यापेक्षा अधिक कामे न करता न केलेल्या कामांच्या खोट्या नोंदी घेण्यात आल्या. बनावट मजुरांच्या नावे खोट्या पोचपावत्या लिहून तथा बोगस स्वाक्षर्‍या करून देयके उचलण्यात आली आहेत, असे राजेश चारखोड यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही.गुरमे यांच्याकडे ८ जून रोजी सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले होते.