शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कारंजा हँडबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:40 IST

२१ वी पश्‍चिम विभागीय पुरु ष व महिला  राष्ट्रीय स्पर्धा अंबाजी व्हिलेज अबु रोड गुजरात येथे १७ स प्टेंबर ते २0 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे.  त्याकरिता महाराष्ट्र राज्याची संघ निवड चाचणी स्पर्धा  शनिवार ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले,  रुखमे नगर अहमद पुर जि.लातुर येथे लातुर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन  व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने  पार पडली. यामध्ये कारंजा चमुची निवड झाली आहे.

ठळक मुद्दे१७ ते २0 सप्टेंबर राष्ट्रीय स्पर्धा खेळाडूंचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : २१ वी पश्‍चिम विभागीय पुरु ष व महिला  राष्ट्रीय स्पर्धा अंबाजी व्हिलेज अबु रोड गुजरात येथे १७ स प्टेंबर ते २0 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे.  त्याकरिता महाराष्ट्र राज्याची संघ निवड चाचणी स्पर्धा  शनिवार ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले,  रुखमे नगर अहमद पुर जि.लातुर येथे लातुर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन  व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने  पार पडली. यामध्ये कारंजा चमुची निवड झाली आहे.सदर निवड चाचणी स्पर्धेमध्ये आपल्या संत गजानन महाराज  हॅडबॉल क्लब तथा दि.हँडबाूल   असोसिएशन ऑफ वाशिम  डिस्ट्रीकच्या ७ खेळाडूंनी निवड चाचणी  स्पर्धेमध्ये भाग घे तला होता.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातुन  आलेल्या  खेळाडूमधून १६ खेळाडूंचा संघ निवड समितीव्दारे  निवडण्यात आला. हँडबाूल असोसिएशनचे महाराष्ट्राचे   सेक्रेटरी जनरल  रणधिरसिंग व सहसचिव सुदेश मालप यांनी  महाराष्ट्राचा संघ जाहीर केला. महाराष्ट्र राज्याच्या महिला  हँडबॉल संघामध्ये आपल्या क्लबच्या नंदीनी कटारीया, ऋ तुजा दत्तात्रय देशमुख यांची निवड झाली. अक्षया सुनिल  सुडके व चिन्मयी संतोष धोटे या दोन मुलींनी राखीव खेळाडू  म्हणून निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पुरुष  हँडबॉल संघामध्ये आपल्या क्लबचा शुभम प्रेमसिंग चव्हाण,  याची राखीव खेळाडू म्हणुन निवड झालेली आहे. निवड  झालेल्या  सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर १३ सप्टेंबर रोजी पासून मुंबई येथे हँडबॉलचे आंतर राष्ट्रीय खेळाडू वैभव वाघ  व देवेंद्र चौघुले यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे.  महाराष्ट्राचा  संघ स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता   १६ सप्टेंबर  रोजी गुजरात येथे जाण्याकरिता रवाना होणार आहे. नंदीनी  कटारीया, ऋतुजा देशमुख, चिन्मयी धोटे, स्थानिक  आर.जे.सी.चवरे, कारंजा ची विद्यार्थीनी असुन अक्षया  सुडके ही स्थानिक जे.सी.स्कुल कारंजाच्या विद्यार्थीनी आहे.  तसेच शुभम प्रेमसिंग चव्हाण क्लबचा खेळाडू   असुन वरील  सर्व खेळाडू नियमितपणे हँडबॉल या खेळाचा तालुका क्रिडा  संकुल कारंजा येथील हॅडबाूलच्या मैदानावर सराव करतात.  खेळाडूंची निवड झाल्यामुळे कारंजा नगरीच्या शिरपेचात  मानाचा तुरा गोवला गेला आहे. या निवडीमुळे निश्‍चितच  वाशिम जिल्ह्यात हँडबॉल खेळाचा प्रसार करण्यास मदत  होईल. सदर खेळाडूंची सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.  निवड झालेल्या सर्व मुलींनी आपल्या निवडीचे श्रेय आपले  आई वडील प्रशिक्षक  प्रशांत महल्ले, पराग गुल्हाणे, दर्शन  रोकडे, शुभम चौधरी, स्वप्नील महाजन, सचिव राहुल गावंडे  यांना देत आहे. हँडबॉल असोसिएशन वाशिमचे अध्यक्ष  देवेंद्र पाटील ताथोड, उपाध्यक्ष गोपाल पाटील भोयर,  राजुभाऊ मते, सहसचिव विनोदभाऊ कडु, बॉस्केट बॉल,  असोसिएशनचे सचिव शशिभाऊ नांदगावकर, राजुभाऊ  अढाऊ, भरत हरसुले, विवेक गहाणकरी, दिनेश पळसकर,  वसंतराव साबळे, सुनिल सुडके, डॉ.संतोष धोटे, सनि राऊ त,  दिनेश धारपवार, रंजीत रोतेले, राजेश शेंडोकार , राम  धर्माधिकारी, दुर्गेश मिसाळ, धिरज डहाके, धिरज कातखेडे,  यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक होत आहे.