शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी, अडत्यांनी पुकारले असहकार आंदोलन!

By admin | Updated: July 12, 2016 00:42 IST

वाशिम जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद ; फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचा व्यापा-यांकडून कडाडून विरोध.

वाशिम : फळे व भाजीपाला नियंत्नणमुक्त करतानाच शेतकर्‍यांऐवजी खरेदीदाराकडून व्यापार्‍यांचे कमिशन (अडत) घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी कडकडीत बंद होत्या.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची थेट विक्री करणार्‍यांना शासनाने सर्व नियमातून सूट दिली. बाजार समितीमध्ये मात्न शेतकर्‍यांऐवजी ग्राहकांकडून अडत घेण्याचे बंधन घातले. या दुहेरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी व्यापार्‍यांनी बेमुदत सामूहिक आंदोलन सुरू केले आहे.जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून शिरपूरजैन, अनसिंग, राजगांव याठिकाणी उपबाजार समिती अस्तित्वात आहे. व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार सोमवारी ठप्प झाले. सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांकडून एकूण रकमेच्या ८ टक्के अडत वसूल केली जाते. मात्र, शेतकर्‍यांच्या हितास्तव शासनाने शेतकर्‍यांकडून अडत वसूल न करता ग्राहकांकडून वसुलीचा निर्णय घेतला. त्यास व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांनी भाजीपाला, फळे बाजार समितीमध्ये विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडून केले जात आहे.