शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पासेस प्रक्रियेत अडकल्या ‘मानव विकास’च्या बसेस!

By admin | Updated: June 29, 2016 01:14 IST

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष ; शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती.

शिखरचंद बागरेचा / वाशिमदीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवार, २७ जून रोजी नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला; मात्र या दिवशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या मानव विकास मिशनच्या बसेस अनेक गावांमध्ये पोहोचल्याच नाहीत. शाळेच्या दुसर्‍या दिवशीही हीच स्थिती कायम राहिल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पासेस प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्यानेच हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यातील ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी राज्यशासनाने राज्य परिवहन महामंडळाला मानव मिशन बससेवा उपलब्ध करून दिली आहे. खास विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस २७ जून रोजी शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल व्हायला हव्या होत्या; मात्र जिल्ह्यातील वाशिम आणि मंगरूळपीर आगाराने पहिल्याच दिवशी बसेस न सोडल्यामुळे शाळेसाठी तयार झालेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली.