वाशिम : शहरातील धोकादायक इमारती १५ दिवसांच्या आत जमिनदोस्त करा असा निर्वाणीचा इशारा नगर पालिका प्रशासनाने आज पून्हा धोकादायक इमारतींच्या मालकांना दिला आहे. त्यामुळे पून्हा एकदा खळबळ उडाली आहे. नगर पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले आहे. यामध्ये शहरात १९ धोकादायक इमारती असल्याचे आढळून आले आहे. सदर इमारती तात्काळ भुईसपाट करण्यात याव्या यासाठी पालिकेने इमारतींच्या मालकांना नोटीस निर्गमित केलेल्या होत्या. लोकमतने २७ मे च्या अंकात शहरातील धोकादायक इमारतीचे चित्र लोकाभिमुख केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा नगर पालिका प्रशासनाने हा प्रश्न गांभिर्याने घेतला असुन सदर धोकादायक इमारती जमिनदोस्त करण्यासाठी संबधितांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या दिवसांधमध्ये इमारती पाडल्या गेल्या नाहीत. तर नगर पालिका स्वत:च्या यंत्रणेच्या माध्यमातून या इमारती पाडण्याची कारवाई सुरू करेल असा निर्वाणीचा इशारा पालिकेने आज पून्हा या इमारतींच्या मालकांना दिला आहे.
खळबळधोकादायक इमारती जमिनदोस्त करा!
By admin | Updated: May 28, 2014 00:34 IST