रिसोड(जि. वाशिम), दि. २८ : घरामध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने, असा २0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २७ ऑगस्टच्या मध्यरात्री शहरातील अमरदास नगरमध्ये घडली. सदानंद धांडे यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की रात्रीच्या सुमारास झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपातील रोख ८ हजार रुपये व दागिने असा २0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हय़ाची नोंद करण्यात आली. तथापि, गत पंधरवड्यात वाशिम जिल्हय़ातील मालेगाव येथे सलग चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता चोरट्यांनी रिसोडकडे आपला मोर्चा वळविला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
रिसोड येथे घरफोडी
By admin | Updated: August 29, 2016 00:12 IST