शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजारात शुकशुकाट; ग्राहकांनी फिरवली पाठ!

By admin | Updated: November 13, 2016 02:32 IST

नोटा बंदचा परिणाम; सोन्याचे दर वधारले.

वाशिम, दि. १२- पाचशे, एक हजाराच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेचे पडसाद बुधवार पासून वाशिमच्या सराफा बाजारात उमटले. सोन्याचे दर ३ ते ४ हजारांनी वाढले. मात्र, बाजारात शुकशुकाट असल्याने व्यापार एकदम ठप्प पडला. एरवी वाशिमच्या सराफा बाजारात सकाळपासून गर्दी असते. मात्र, बुधवार पासुन बाजार एकदम थंडावला. सराफा व्यापार्‍यांनी केवळ शंभराच्या नोटा अथवा त्याखालील नोटांमध्येच व्यवहार सुरू ठेवल्यामुळे उलाढालीत कमालीची घट झाल्याचे ओम ज्वेलर्सचे आदित्य वर्मा, विसपुते ज्वेलर्सचे प्रशांत एकनाथ विसपुते यांनी सांगितले. शासनाने बंद ठरविलेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने अनेक मोठ्या ग्राहकांची पंचाईत झाली. गुरूवारला प्रतितोळा ३१ हजार ४00 रुपयांवर बंद झालेले सोन्याचे दर शहरात शनिवारला वेगवेगळे बघावयास मिळाले. शहरातील प्रत्येक दुकानामध्ये सोन्याच्या दरामध्ये प्रचंड तफावत आढळून आली. सोन्याच्या दराबाबत अनिश्‍चिततेचे वातावरणसोन्याच्या दराबाबत सराफा व्यापारी काहीही बोलायला तयार नव्हते. ओम ज्वेलर्समध्ये मात्र ३३ हजार ३00 रुपये प्रतितोळा दर असल्याचे सांगण्यात आले. शनिवारलाही अनेक नागरिकांनी सराफ बाजारातील मोठ्या व्यापार्‍यांना बल्कमध्ये सोने खरेदीबाबत विचारणा केल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास ज्वेलर्सकडून नकार देण्यात येत होता. त्यामुळे या धनिकांची चांगलीच पंचाईत झाली. तीन दिवसांत बसला एक कोटींचा फटकाशासनाने ५00 व १000 रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या चार दिवसापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले. ग्राहक ५00 व १000 रू पयांच्या नोटा घेवून सोने-चांदी खरेदीसाठी येत होते. मात्र हा व्यवहार अडचणीचा वाटल्याने सराफ व्यावसायिकांनी सोने-चांदीचे व्यवहार केले नाहीत. नोटा रद्द करण्याच्या या निर्णयामुळे वाशिमच्या सराफा बाजाराला बुधवार पासुन सुमारे एक कोटींचा फटका बसला, असे सराफा व्यापारी गोविंद वर्मा यांनी सांगितले.