वाशिम : बुद्ध जयंतीनिमित्त वाशिम शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सकाळी बुद्ध विहारांमध्ये सामुहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना घेण्यात आले. त्यानंतर मिरवणूक काढून रात्री प्रबोधनपर कार्यक्रम पार पडले. तथागत गौतम बुद्धांचा करुणा, मैत्री, समता आणि शांतीचा संदेश देत बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने आज (दि.१४) शहरातून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँक्टिवा फोरम, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, जम्बुद्विप संघ, धम्मसेवा महिला मंडळ, त्रिरत्न बुद्ध विहार समिती यांच्या वतीने करण्यात आले होते. विविध घोषणांसोबतच वाहनावर लावलेले पंचरंगी निळे ध्वज शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. बुद्ध पोर्णिमेनिमित्त सकाळी पाच वाजता नालंदा नगर येथील बुद्धविहारात परित्राण पाठ आणि ध्यानसाधनेचे आयोजन केले होते. सकाळी ८ वाजता भन्ते प्रज्ञापाल यांचे हस्ते धम्मध्वजारोहन करण्यात आले.
बुद्ध जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात
By admin | Updated: May 14, 2014 23:00 IST