शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धडधाकट इसमाने दिव्यांग भावाला केली मारहाण!

By admin | Updated: July 17, 2017 13:50 IST

दिव्यांग असलेल्या भावाच्या हिस्स्यातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली.

शेतीचा वाद विकोपाला : आरोपी भावावर गुन्हा दाखलवाशिम : वडिलांनी दोन भावांमध्ये शेतीची हिस्सेवाटणी करून दिली; परंतू त्यावर समाधान न मानता दिव्यांग असलेल्या भावाच्या हिस्स्यातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी १६ जुलै रोजी आरोपी भावाविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.पंढरी रामभाऊ कड (वय ४५ वर्षे, रा. सावरगाव बर्डे, ता. वाशिम) यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की माझा लहान भाऊ पांडूरंग रामभाऊ कड हा बायका-पोरांसह घराशेजारीच वास्तव्याला आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून तो शेती वाटपाच्या मुद्यावरून मला व वडिलांना शिविगाळ करून मारहाण करण्याच्या धमक्या द्यायचा. त्याला माझ्या हिस्स्यातून दोन गुंठे जमिन पाहिजे आहेत. मी व वडिलांनी त्याला अनेकवेळा समजावून  सांगूनही तो त्याचा  हट्ट सोडत नव्हता. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मी तीनचाकी सायकलने घरी निघालो असताना पांडूरंगने जवळ येऊन मारहाण करायला सुरूवात केली. न मारण्याची विनवणी करूनही त्याने ऐकले नाही; तर जवळच पडून असलेल्या काठीनेही मारहाण केली. यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर सायकलसकट उलटे पाडले. यावेळी माझा मुलगा आणि माझा दुसरा भाऊ विठ्ठल कड हे धावत घटनास्थळी आल्यामुळे माझा जीव बचावला. पंढरी रामभाऊ कड यांनी दाखल केलेल्या अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी पांडूरंग रामभाऊ कड याच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.