शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर गटविकास अधिकारी एलसीबीच्या जाळय़ात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:57 IST

वाशिम: मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी  संजय नामदेवराव महागावकर यांनी विहिरीच्या खोदकामाच्या  बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची  लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने सोमवार, २५ स प्टेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून दुपारच्या  सुमारास महागावकर यांना अटक केली.

ठळक मुद्देएक हजार रुपयांची मागितली लाचअकोला येथील उर्दू शिक्षक भरतीप्रकरणी आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी  संजय नामदेवराव महागावकर यांनी विहिरीच्या खोदकामाच्या  बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची  लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने सोमवार, २५ स प्टेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून दुपारच्या  सुमारास महागावकर यांना अटक केली.प्राप्त माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन  योजनेंतर्गत तक्रारदारांच्या वडिलांचे नावे झालेल्या विहिरीच्या  खोदकामाच्या पहिल्या बिलाचा ७१ हजार रुपयांचा धनादेश  खात्यामध्ये जमा करण्यासाठी गटविकास अधिकारी महागावकर  याने २९ ऑगस्ट रोजी एक हजाराची लाच मागितली होती, अशी  तक्रार १३ सप्टेंबर रोजी वाशिम येथील एसीबी कार्यालयात  दिली. या तक्रारीवरून १४ सप्टेंबर रोजी पडताळणी केली अस ता गटविकास अधिकारी महागावकर यांनी पडताळणीदरम्यान १  हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून १८  सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला  असता गर्दी वाढल्यामुळे तक्रारदारावर संशय आला त्यामुळे  गटविकास अधिकार्‍याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. १४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकार्‍यांनी तक्रारदार  यांच्याकडून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने  गटविकास अधिकारी महागावकर यांना सोमवारी जिल्हा परिषद  कार्यालयातून ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात स् थायी समितीची सभा सुरू होताच, लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या पथकाने एका शिपायामार्फत महागावकर यांना बाहेर  बोलाविण्यात आले. सभागृहाच्या बाहेर येताच, एसीबीच्या प थकाने महागावकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कलम ७  लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल  केला.