शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

By admin | Updated: February 17, 2017 20:35 IST

येथील एका इसमास प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी हव्या असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाच मागून

ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड (जि.वाशिम), दि. 17 - येथील एका इसमास प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी हव्या असलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाच मागून २.५ हजार रुपये स्विकारताना काळी कारंजा येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने शुक्रवार, १७ फेब्रूवारीला रंगेहात अटक केली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, जनऔषधी केंद्रासाठी लागणाºया नाहरकत प्रमाणपत्राकरिता ग्रामसेवक सुरेश गांजरे यांनी ५५० रुपये टॅक्स भरण्यासोबतच ५ हजार रुपये वेगळे द्यावे लागतात, असे आपणास काळी कारंजा येथे कार्यरत ग्रामसेवक सुरेश गांजरे यांनी सांगितल्याची कैफियत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे नोंदविली. त्यावरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारदार आणि मंगरुळपिर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन पंचांना सोबत घेऊन सापळा रचला. यादरम्यान कारंजा येथील एका खासगी कार्यालयात ग्रामसेवक गांजरे याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने शिपाई गणेश तरासे याच्याकडे २.५ हजार रुपये दिले. यावेळी तेथे दबा धरून असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने गांजरे आणि तरासे या दोघांनाही जेरबंद करून कारंजा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही आरोपींविरुद्ध  कलम ७,१२,१३(१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.