शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ग्रामसेवक, शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

By admin | Updated: February 18, 2017 03:26 IST

कारंजा येथील प्रकरण ; नाहरकत प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी

कारंजा लाड , दि. १७- मंजूर झालेल्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना काळी कारंजा येथील शिपाई तथा ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने शुक्रवार, १७ फेब्रूवारीला रंगेहात अटक केली. जनऔषधी केंद्रासाठी लागणार्‍या नाहरकत प्रमाणपत्राकरिता ग्रामसेवक सुरेश गांजरे यांनी ५५0 रुपये टॅक्स भरण्यासोबतच ५ हजार रुपये रकमेची मागणी तक्रारदारास केली. यावर कारवाई करुन लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगरुळपीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन पंचांना सोबत घेऊन सापळा रचला. यादरम्यान कारंजा येथील एका खासगी कार्यालयात ग्रामसेवक गांजरे याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने शिपाई गणेश तरासे याच्याकडे २.५ हजार रुपये दिले. यावेळी तेथे दबा धरून असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने गांजरे आणि तरासे या दोघांनाही जेरबंद करून कारंजा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ७,१२,१३(१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.