वाशिम : नगर परिषदेच्या मालमत्ता अभिलेखावर मालमत्ता मालक म्हणून नोंद करण्यात यावी, याकरिता तीनशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक राम सोनाजी वानखेडे यांना पालिकेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. लोकमतशी बोलताना त्यांनी या बाबीला दुजोरा दिला आहे. तीनशे रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने वानखेडे याला १६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. मुख्याधिकारी इंगोले यांनी २0 नोव्हेंबरला वानखेडेला निलंबित केले या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वानखेडे निलंबित राहणार आहे.
लाचखोर लिपिक निलंबित
By admin | Updated: November 21, 2014 01:17 IST