शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय बॅनरबाजीला आचारसंहितेचा ब्रेक

By admin | Updated: September 15, 2014 00:29 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकीय बॅनर उतरली

वाशिम : विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत होताच जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरांसह गावागावात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे व राजकारण्यांचे पोस्टर्स, बॅनर, इमारतींवरील जाहीराती झाकण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विधानसभा आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमिवर आता राजकारण्यांमध्ये सुरू झालेल्या बॅनरवॉरला लगाम बसणार आहे. गत एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. तेव्हापासून राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली होती. वाशिम जिल्हाही याला अपवाद नव्हता. विधानसभा निवडणूकीत विजयाच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तर विद्यमान आमदार अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक दृष्ट्रीपथात ठेऊनच विविध कामांच्या भूमिपुजनाचा सपाटा लावला होता. आचारसंहिता लाबल्यामुळे यांच्या दुधातच साखर पडली होती. परंतु १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागली आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या भूमिपुजनाच्या सपाट्याला लगाम लागला आहे. विद्यमान आमदारांचे काही प्रस्ताव प्रशासकीय मंजुरातीविना अडले असुन काही निधीही परत जाण्याची शक्यता आहे दुसरकडे विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तीपणास लावणार्‍या काही इच्छूकांनी मतदार संघात सर्वत्र बॅनर , पोस्टर्स लावून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून बॅनर लावले होते. आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही सर्व बॅनर उतरविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक राजकीय पक्षाला आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना केल्या आहेत. या शिवाय प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, लाऊडस्पिकर तथा अन्य साधनांचीही रितसर परवानगी घ्यावी असे प्रशासनाने राजकीय पक्षांना सुचीत केले आहे.           स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यासह वैधानिक विकास महांमडळ व इतर मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडे असलेले शासकीय वाहने तात्काळ जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सदर पदाधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली आहे.आचारसंहितेच्या पृष्ठभूमिवर प्रशासनानेराजकीय पक्ष व राजकारण्यांना बॅनर काढण्याचे आदेश देऊनही कुणी या आदेशाचा भंग केल्यास त्याच्यावर प्रशासनाकडुन कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने खास पथक गठित केले असल्याची माहीती आहे.