शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दारु दुकानाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील मंगळवारी वेश परिसरात दारुच्या दुकानावर तोडफोड करुन मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणात १३ आरोपींविरुध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादी बन्सीलाल शालीकराम जयस्वाल (५५) यांनी फिर्याद दिली की, मंगळवारी आपले दारुचे दुकान उघडल्यानंतर मेव्हना ...

ठळक मुद्देघटना मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली१३ आरोपींविरुध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखलनवीनकुमार मंडल यास पोलिसांनी ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील मंगळवारी वेश परिसरात दारुच्या दुकानावर तोडफोड करुन मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणात १३ आरोपींविरुध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादी बन्सीलाल शालीकराम जयस्वाल (५५) यांनी फिर्याद दिली की, मंगळवारी आपले दारुचे दुकान उघडल्यानंतर मेव्हना विजय राधेशाम जयस्वाल, नोकर दीपक पिंजरकर, कानबाराव गुडदे व विष्णु इंगळे हे व्यवसाय करत असतांना दुकानाबाहेर डॉ.तस्लीम शेख व इतर १0 ते १२ अनोळखी इसमांनी कोणतेही कारण नसतांना टिन शेडवर दगड मारुन नुकसान केले. त्यातील अनोळखी तीन ते चार इसम दुकानात शिरले व त्यांनी आपल्या पोटात लाथ मारली. दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच दुकानातील देशी दारुच्या बाटल्या फोडुन नुकसान केले. विजय  जयस्वाल याच्या उजव्या पायावर विट व फरशी तुकडा फेकुन मारले. तसेच मला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. सदर घटनेपुर्वी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिहार राज्यातील जिल्हा रनगटीया माधापुर येथील नवीनकुमार मंडल (२८) याने एका बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली. सदर घटनेप्रकरणी आरोपी नवीनकुमार मंडल याच्याविरुध्द तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी मंडल यास ताब्यात घेतले असुन चौकशी करीत आहे.