शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ढोरखेडाच्या शेतकऱ्यांचा पेरणीवर बहिष्कार !

By admin | Updated: May 4, 2017 01:10 IST

शिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

ग्रामसभेत घेतला निर्णय : कुटुंबापुरतेच उत्पन्न घेण्याचा निर्धारशिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालास अपेक्षीत भावच न मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात महागडी बि-बियाणे आणि खते खरेदी करावी की घराचा डोलारा सांभाळावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी शेती बंदचा अर्थात पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी शेतमालच नसताना प्रत्येक वाणाचे दर गगनाला भिडले होते. यंदा मात्र कोणत्याच शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून पिक काढणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अपेक्षीत भावाअभावी पिककर्जाची परतफेड करणे त्यांच्यासाठी कठीण झाल्यानेच ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी गावात रितसर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या सभेला ढोरखेडा या गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढेच उत्पादन घेणार सुल्तानी आणि अस्मानी संकटाला कंटाळलेल्या ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी, कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी काही अर्थार्जन आवश्यक असते; परंतु थेट कोणतेही काम करून अर्थाजन करण्याऐवजी शेतीत स्वत:च्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल, एवढेच पिक घेण्याचे या शेतकऱ्यांनी ठरविले आहे. गावातील महिला शेतकरी सुनिता दत्तात्रय मिटकरी यांनी हा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवला आणि त्याला राधेशाम पद्माकर सावले यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील वर्षी जिल्ह्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेती बंदचा निर्णय घेत शासनाच्या शेतीविषयक धोरणाला विरोध दर्शविला होता. आता ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतात राबराब राबून पिकविलेल्या शेतमालास अपेक्षीत भाव मिळत नाहीत. लावलेला खर्चही त्यामुळे वसुल होणे कठीण झाले असताना कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने आत्महत्या करण्याची पाळी आम्हावर आली आहे. घाम गाळून मुलेबाळे उपाशी मारण्याऐवजी आम्ही शेतीच न करण्याचे ठरविले आहे. -राधेशाम सावले, शेतकरी ढोरखेडा