शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

बोगस देयकांना बसणार चाप !

By admin | Updated: July 31, 2015 23:58 IST

खात्री करूनच देयक पारित करण्याच्या कोषागाराला सूचना.

संतोष वानखडे / वाशिम: वैयक्तिक लाभार्थी, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य काही विभाग व योजनांमधील बोगस देयकांना चाप बसविण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. मंजूर यादी व आधार क्रमांकानुसार वैयक्तिक लाभार्थींंचे देयक मंजूर करावे, मागील तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या अनुदानापैकी ७५ टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च झाल्यानंतरच दुसरे देयक मंजूर करण्याच्या सक्त सूचना वित्त विभागाने राज्यातील कोषागार कार्यालयांना २४ जुलै रोजी दिल्या आहेत. विकासात्मक व विधायक कामांसाठी वित्त विभागातर्फे सर्व विभागांना निधी वितरित केला जातो. वितरित केलेला निधी योग्य ठिकाणी खर्च झाला तर त्याचे विधायक परिणाम दिसून येतात. वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना शासन राबवित आहे. या योजनांचा निधी खरोखरच वैयक्तिक लाभार्थींंपर्यंंत पोचत आहे की नाही, यावर देखरेख म्हणून आता वित्त विभागाने काही सुधारणा केल्या आहेत. शासनाच्या निधीचा योग्य वापर होण्याच्या दृष्टिकोनातून आणि बोगस देयकांना चाप बसविण्यासाठी यापुढे लाभार्थी यादी आणि आधार क्रमांक याची सांगड घालून संबंधित विभागाने कोषागार कार्यालयात देयक सादर करण्याची अट टाकण्यात आली आहे. कोषागार कार्यालयानेदेखील या सत्यतेची खात्री पटल्यानंतरच देयक पारित करावे, अशा सूचना वित्त विभागाने दिल्या आहेत. बांधकाम विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देताना संबंधित विभागाने सक्षम अधिकार्‍याची मान्यता घेतल्याचा उल्लेख आदेशात करावा आणि कोषागार कार्यालयाने याची खात्री करावी, त्यानंतरच देयक पारित करावे, अशीही अट टाकण्यात आली आहे. वित्तीय शिस्तीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत.