शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारने शेतक-यांना भिकारी करून टाकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 19:04 IST

वाशिम - शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात विविध आघाडींवर भाजपा सरकार अपयशी ठरले असून, दारोदारी शेतकºयांना फिरावे लागत आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: भिकारी करून टाकले, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रविवारी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस नेते व पदाधिकाºयांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोपवाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात साधला संवाद 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात विविध आघाडींवर भाजपा सरकार अपयशी ठरले असून, दारोदारी शेतक-यांना फिरावे लागत आहे. भाजपा सरकारने शेतक-यांना अक्षरश: भिकारी करून टाकले, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रविवारी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस नेते व पदाधिका-यांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आम्ही आमच्या कार्यकाळात शेतक-यांसाठी ऐतिहासिक अशी कर्जमाफी केली. शेतकºयांकडून कोणताही अर्ज भरून न घेता कर्जमाफीचा लाभ दिला. भाजपा सरकारने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शेतक-यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले. ८९ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत, असे सरकारने सांगितले होते. आता कर्जमाफीसाठी ५८ लाख शेतक-यांचे अर्ज झाल्याने उर्वरीत शेतकरी गेले कुठे, ८९ लाखाचा आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला. ८९ लाख शेतक-यांसाठी ३४ हजार कोटींची तरतूद केल्याचे सरकार सांगत आहे. ३४ हजार कोटींची तयारी केली असेल तर दीड लाख रुपयांऐवजी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचेही माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. भाजपा सरकारने बळीराजांचा घोर अपमान चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

नारायण राणेंनी आत्मपरिक्षण करावे !नारायण राणेंसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, नारायण राणे हे ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यांनी स्थिर राहून काम केले पाहिजे. राणे यांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.