रिसोड : येथील लोणीफाट्यावरील वनउद्यानाजवळ बजाज एमएटीने ३ जूनच्या रात्री ७ वाजता जबर धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. या घटनेत बजाज एमएटीचालक गंभीर जखमी झाला आहे. येथील शरद रामकिसन ठोकरे (वय ३२) हे शेतामधून दुध घेऊन पायी घरी येत असताना वनउद्यानाजवळ मागील बाजुने भरधाव वेगात आलेल्या एमएच २८-२६0 क्रमांकाच्या बजाज एमएटीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांना उपचारार्थ अकोला येथे ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.त्यांचा तेथे उ पचारादरम्यान रात्री १२ वाजता मृत्यू झाला.या घटनेत दुचाकी चालक सलीम बेकरीवाले हेदेखील गंभीर जखमी असून ओझोनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याविरुद्ध भादवि २७९,३३८, ३0 ४ अ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
दुचाकीची धडक, एक ठार
By admin | Updated: June 5, 2014 00:58 IST