शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सायकल दुकानाला भीषण आग!

By admin | Updated: March 3, 2017 00:40 IST

लाखोंचे नुकसान : पाटणी चौकातील घटना

वाशिम, दि.२ - येथील पाटणी चौकात असलेल्या रोहित सायकल स्टोअर्स दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत दुकानातील सर्व साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.वाशिम येथील पाटणी चौकात रोहित चांदवाणी यांचे रोहित सायकल स्टोअर्स नावाचे सायकल विक्री आणि दुरुस्तीचे मोठे दुकान आहे. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शिंदे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर थोड्याच वेळाने आग लागली. थोड्याच वेळात या आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कदम घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष अशोक हेडा हेसुद्धा घटनास्थळावर दाखल झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि जवळपास दीड तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी या घटनेत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग कशामुळे लागली, त्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करून अग्निशमन दलास ही आग आटोक्यात आणण्यास सहकार्य केले.या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, या प्रकरणी संपूर्ण तपासानंतरच आग लागण्याचे कारण कळू शकणार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. आग एवढी भीषण होती, की या दुकानाला लागून असलेल्या मोबाइलच्या दुकानालाही आग लागून मोठे नुकसान झाले. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.